गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न.! आनंददायी व दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत...
![गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न.! आनंददायी व दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66c9b931057af.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रं.१ येथे.गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा नुकतीच पार पडली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नितिन बागुल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पर्यावरण पूरक सण - उत्सव साजरे केले पाहिजे.गणेश मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या विकत घेऊ नये प्लॅस्टर ऑफ पॅरिस मुळे पर्यावरणाचा रास होतो हानी होत आहे प्लास्टर ऑफ पॅरिस हे पाण्यामध्ये विरघळत नाही तलावात मुर्त्या तशाच असतात त्यातून पाणी प्रदूषण होते.म्हणून शाडू माती पासुन बनवलेली गणपती बनविण्याची सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय समिती सदस्य दर्शना पवार ह्या होत्या.
यासाठी कार्यशाळेत मोहाडी येथील शंकर क्षीरसागर व ओम कळमकर यांना आमंत्रित करून त्यांनी हस्तकलेपासून विद्यार्थ्यांना माती पासून गणपती,बैल,व इतर वस्तू बनून दाखविल्या तसेच शाडू माती पासुन बनवलेली गणेश मूर्ती ह्या घरो घरी स्थापन करण्याचे आवाहन देखील केले.
कार्यक्रम सूत्रसंचालन सुशिला बिरारी यांनी केले. तर आभार इंदिरा भागवत यांनी मानले.कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रभावती राऊत,किरण बोरसे,विक्रम बागर, नंदकिशोर नागपुरे,अरुण रोडे भाग्यश्री गोसावी,ज्योती नागरे, निलीमा जोशी,संगीता चव्हाण, संगीता महाजन,अर्चना पवार,साईरा तडवी,सरला पाटोळे,सुनीता निकम , लीलावती थोरात,सुरेखा शिरोडे, वैशाली पालवे,अनिता बेलसरे,मथुरा वळवी,सुनंदा राऊत,आदींनी परिश्रम घेतले.