शेती आणि माती यांचं आरोग्य टिकले तरच मानवाचे आरोग्य चांगले राहील- पदमश्री पोपरे
News15 मराठी प्रतिनिधी बापु चव्हाण
दिंडोरी : शेती आणि माती यांचं आरोग्य टिकलं तरच मानवाचे आरोग्य चांगले राहील म्हणून शिक्षकांनी आजपासूनच विद्यार्थ्यांना विषमुक्त अन्नधान्य उत्पादन व सेवन याचे महत्त्व बाळकडू म्हणून देणे गरजेचे आहे. सेवन केल्याने होणारे वेगवेगळे आजार यामुळे भारतासह जग हे विनाशाच्या उंबरठ्यावर आलेले आहे. पूर्वी जे आजार वय वर्ष साठी नंतर व्हायचे तेच आजार आता जन्मतात बालकाला व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणून आपण पुढच्या पिढीला कळत नकळत विषयाचे डोस पाजत आहोत. म्हणून त्यांना वारसा करणे विष मुक्त शेतीचे समजावयाला हवे.
विद्यार्थी आणि पालक यांचं शिक्षकांची थेट संपर्क असल्याने शिक्षकांनी ही जाणीव जागृती अन्नधान्य साक्षरतेच्या बाबतीत करावी असे आवाहन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले. निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे पद्मश्री राईबाई कोपरे बोलत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जी.एन.पी. ऍग्रो सायन्स चे संचालक गौतम बापू पाटील हे होते. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या गावी शिरवाडे वणी येथे कुसुमाग्रज जयंती व जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या वतीने नाशिक शहर व जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक यांना कविवर्य कुसुमाग्रज जीवनगौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या भेटी दिलेल्या स्थळाला शोभायात्राद्वारे भेट देत मिरवणूक काढण्यात आली.
ग्रामपालिकेच्यावतीने सरपंच शरद काळे यांनी भेट दिलेल्या सर्व गुरुजनांचे स्वागत केले. हॉटेल दौलत येथे कार्यक्रमात दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन आणि कविवर्य कुसुमाग्रज प्रतिमापूजन करण्यात येऊन दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी नाशिक येथील संगीतकार दिनकर दांडेकर,मयूर खुळे,विशाल खुळे,संजय बगाड यांनी यांनी सास्कृतिक कार्यक्रम सादर केला. या वेळी विजय चैत्रम यांनी सादर केलेला नट सम्राट नाट्यप्रवेश हा अनेकांची वाहवा मिळवून गेला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश सलादे यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गौतम बापू पाटील, कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, मविप्रचे सभापती बाळासाहेब शिरसागर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक भाऊसाहेब भालेराव, हॉटेल दौलतचे संचालक रामभाऊ भालेराव, शिरवडे व शिरवाडे सरपंच शरदराव काळे, कादवाचे व्हॉ. चेअरमन शिवाजी दादा बसते, शहाजी दादा सोमवंशी, एन.डी.माळी उपस्थित होते.
नाशिक शहर व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तीन शिक्षकांना कविवर्य कुसुमाग्रज सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. राहीबाई पोपरे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना विष मुक्त शेतीचा आग्रह विद्यार्थ्यांना व पालकांना याबाबत जाणीवपूर्वक जनजागृती करण्याचे आवाहन केले. यावेळी गणेश निंबाळकर यांनी शिक्षक हा नवनिर्मितीचा धनी असून जाणीवपूर्वक केलेले संस्कार शेती आणि मातीशी नाळ जोडणारे ठरतील असे आवाहन केले.यावेळी डॉ. प्रा. पुंडलिक रसाळ, डॉ. प्राचार्य दिलीप पवार, डॉ. प्रा.वैशाली सूर्यवंशी डॉ. प्रा.दिलीप डेरले, शिक्षिका उज्वला पवार,ज्येष्ठ शिक्षक दिलीप अहिरे, यांना जीवनगौरव हा सन्मान कुसुमाग्रजांच्या नावे देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी पवार प्रा. सोनाली काळे यांनी केले, आभार कैलास सलादे यांनी मानले.