मुसळदार पावसामुळे शिरूर अनंतपाळ नजीकचा घरणी नदीवरील पर्यायी रस्ता गेला वाहवून...
प्रतिनिधी- सुधाकर सूर्यवंशी, लातूर
शिरूर अनंतपाळ तालुका परिसरातील तीन्ही मंडळात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. पण सर्वाधीक पाऊस हा शिरूर अनंतपाळ मंडळात दि.१० जून २०२४ रोजी संध्याकाळी मुसळदार पावस झाल्याने आणि घरणी नदीला पुर आल्याने; सध्या शिरूर अनंतपाळ नजीक असलेल्या शिरूर अनंतपाळ - उदगीर रोडवरील पुलाचे काम सुरू असून, वाहतुकीसाठी बाजुने पर्याय रस्ता काढून देण्यात आला होता.
तो रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेल्यामुळे सध्या समतानगर, पांढरवाडी, येरोळ, दैठणा, उदगीर, साकोळ, वलांडी, कडे जाणारा मार्ग बंद आहे. वाहतुक ठप्प झाल्याने पर्यायी मार्ग म्हणून नागरीक तळेगाव (दे ) मार्गे शिरूर अनंतपाळ कडे येत आहेत. यात पुलाचे काम उशिरा सुरु झाल्यानेच पर्याय पुल वाहून गेला आणि त्याचा त्रास शेतकरी, वाहनधारकांना होत आहे. प्रशासन सध्या पर्यायी रस्ता करून देण्याचा प्रयत्न करीत आहे.