मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लातूर दौरा...
![मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लातूर दौरा...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66c560dd1018b.jpg)
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार, २१ ऑगस्ट २०२४ रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे २१ ऑगस्ट रोजी दुपारी २.१५ वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. दुपारी २.४५ वाजता लातूर येथून हेलिकॉप्टरने परळी वैजनाथ (जि. बीड)कडे प्रयाण करतील. तेथील राज्यस्तरीय कृषी महोत्सव २०२४ कार्यक्रमाला उपस्थित राहून सायंकाळी ५ वाजता त्यांचे हेलिकॉप्टरने लातूर विमानतळावर आगमन होईल व विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.