वादविवाद स्पर्धेत बालभारती पब्लिक स्कुलचे यश...

वादविवाद स्पर्धेत बालभारती पब्लिक स्कुलचे यश...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

मुक्तांगण संस्था व के.के.वाघ शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या गुरुशिष्य स्मृती माह स्पर्धा अंतर्गत इंग्रजी  वादविवाद स्पर्धेत दिंडोरी येथील बालभारती पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आर्या सचिन नाठे हिला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.

तिने तंत्रज्ञानाचे फायदे तोटे या विषयावर मनोगत व्यक्त केले, या प्रतियोगीतेसाठी जिल्ह्यातील नाशिक,दिंडोरी,निफाड,सिन्नर तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता.आर्या हिला बालभारती पब्लिक स्कूलच्या प्राचार्या शुभदा कुलकर्णी व शालेय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले, तिच्या या यशाबद्दल बालभारती पब्लिक स्कूलचे अध्यक्ष प्रितम देशमुख,उपाध्यक्ष डॉ. विलास देशमुख सचिव संदीप शेटे आदींनी अभिनंदन केले.