कादवा कारखान्याची वाटचाल आदर्शवत - प्रमोद पाटील

कादवा कारखान्याची वाटचाल आदर्शवत - प्रमोद पाटील

 NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

कर्मवीर रा.स.वाघ यांनी दिंडोरी च्या माळरानावर कादवा साखर कारखाना सुरू करत,एक धरण होत तालुक्याचे अस्तित्व मिटणार असताना त्यांनी एक धरण ऐवजी पाच धरणांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केल्याने तालुक्याचे हरितक्रांतीची खऱ्या अर्थाने पायाभरणी केली असून त्यांचा आदर्श घेत सुरू असलेली कादवाची व तालुका विकासाची वाटचाल आदर्शवत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्रमोद पाटील अपसुंदे यांनी केले.

कादवाचे संस्थापक कर्मवीर रा.स.वाघ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चेअरमन श्रीराम शेटे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील अपसुंदे बोलत होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर रा.स.वाघ यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना प्रमोद पाटील यांनी कर्मवीर रा.स.वाघ यांनी कादवाची मुहूर्तमेढ रोवली आज चेअरमन श्रीराम शेटे यांचे नेतृत्वात कादवा राज्यात नाव लौकीक मिळवत असून गाळप क्षमता वाढली इथेनॉल निर्मिती सुरू झाली खऱ्या अर्थाने कर्मवीरांचे स्वप्न साकार होत असल्याचे सांगून कर्मवीरांचे आत्मचरित्र पुस्तक रुपी करण्याचे आवाहन केले.चेअरमन श्रीराम शेटे यांनी कर्मवीर रा.स.वाघ ,बाबुराव कावळे यांच्या कार्याची माहिती विषद करत त्यांचा आदर्श घेत कामकाज सुरू असल्याचे सांगत कर्मवीरांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य योगदान द्यावे असे आवाहन केले.

यावेळी कर्मवीर रा.स.वाघ संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी,संचालक रावसाहेब पाटील,विश्वनाथ देशमुख,अशोक वाघ,विजय वाघ,प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर,दिलीप शिंदे,सैय्यद,राजे,पालखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्हा.चेअरमन शिवाजी बस्ते संचालक मधुकर गटकळ दिनकर जाधव,राजेंद्र गांगुर्डे,बबन देशमुख,युनियन अध्यक्ष भगवान जाधव आदी सर्व संचालक किसन भुसाळ,रघुनाथ जाधव, अधिकारी,कामगार युनियन पदाधिकारी कामगार उपस्थित होते. प्रास्ताविक बी.के कावळे विद्यालयाचे प्राचार्य बी.के शेवाळे यांनी केले.आभार अशोक शिंदे यांनी मानले.