पदवीधर संघटनेच्यावतीने, नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा सत्कार...

पदवीधर संघटनेच्यावतीने, नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा सत्कार...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या दिंडोरी शाखेच्या वतीने दिंडोरी गटात पदोन्नतीने नियुक्त झालेल्या केंद्रप्रमुखांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख रामदास धात्रक, हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र गांगुर्डे,एकनाथ अहिरराव,दिंडोरी तालुकाध्यक्ष जयदीप गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी

दादासाहेब अहिरे ( केंद्र-जानोरी) नंदलाल अहिरे (केंद्र-कोचरगाव) दादा पारधी ( केंद्र-रासेगाव/निगडोळ) गोविंद भोये ( केंद्र ननाशी/गांडोळे) सुभाष दंडगव्हाळ ( केंद्र वणी/चौसाळे /पिंपळपाडा) देविदास गांगुर्डे ( केंद्र तळेगांव) यांचा दिंडोरी पंचायत समिती येथ मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.जिल्हा नेते एकनाथ अहिरराव,विजय निकम,जयदीप गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की जिल्ह्यातील कार्यरत पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक यांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळवून देण्यासाठी संघटनेने न्यायालयात जाऊन प्रयत्न केले व शासनाला केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी भाग पाडले.अनेक वर्षापासून रखडलेली पदोन्नती मिळवून देण्यासाठी पदवीधर संघटनेने प्रशासनाला वेळप्रसंगी निवेदन देत सदरच्या विषयावर प्रकाश झोत टाकत सहकार्य सुद्धा केले व संबंधितांना पदोन्नती मिळवून दिली.  

याप्रसंगी गोविंद ढेपले,रमेश पवार, तूषार भदाणे, विश्वास पाटोळे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन जयदीप गायकवाड यांनी केले. तर आभार मंगलदास गवळी यांनी मानले.