अड्याळ येथे संविधान दिन समारोह निमित्त विविध उपक्रम...

अड्याळ येथे संविधान दिन समारोह निमित्त विविध उपक्रम...

News15 मराठी प्रतिनिधी सुधीर शिवणकर 

गोंदिया : समता मुलक समाज युवा मंच अड्याळ द्वारा आयोजित संविधान दिन समारोह निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ गुजरी चौक येथे केले आहे.

संविधान दिनानिमित्त सकाळी ८ वाजता ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात येतील. दुपारी २ वाजता संविधान पर उपस्थित वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता संविधान दिनानिमित्त संगीतमय सामाजिक प्रबोधन तथा कव्वाली प्रबोधनकार संविधान मनोहरे अमरावती व त्यांच्या संच आयोजित केला आहे. कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. लालचंद रामटेके (अशोक मोहोरकर कला व वाणिज्य महाविद्यालय), कार्यक्रमाचे उद्घाटक शिवशंकर मुंगाटे सरपंच, कार्यक्रमाचे सह उद्घाटन प्रशांत मिसाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक, कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते प्राध्यापक अरुण भगत (भारतीय बौद्ध महासंघटक जिल्हा वर्धा), कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे सुवर्णा मुंगाटे जिल्हा परिषद सदस्य, सीमाताई गिरी पंचायत समिती सदस्य, साखरे मॅडम ग्राम विकास अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाप्रसंगी विशेष सहकार्य वैशाली बौद्ध विहार, मैत्रेय बौद्ध विहार, रमाई बौद्ध विहार, हनुमान देवस्थान पंचकमिटी, विठ्ठल रुक्मिणी पंचकमिटी, मुस्लिम एकता कौमी कमिटी, व्यापारी संघटना, सर्व नवयुवक मंडळ व अड्याळ ग्रामपंचायत तथा ग्रामवासी यांनी वरील उपक्रमांच्या लाभ घ्यावा असे आवाहन समता मूलक समाज समिती व आयोजकांनी केले आहे.