आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे लोकार्पण...
NEWS15 प्रतिनिधी - असलम शेख
लातूर : अहमदपुर तालुक्यातील मौजे जगळपूर येथे १० लक्ष रुपयांचा सिमेंट रस्ता आमदार बाबासाहेब पाटील यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून करण्यात आला असून, या सिमेंट रस्त्याचा लोकार्पण सोहळा आज प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. यावेळी आ.पाटील यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधत केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. तसेच मतदारसंघात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मूलभूत सुविधांसोबतच आवश्यक असणाऱ्या विविध गोष्टी मतदारसंघाच्या प्रत्येक भागात आपण उपलब्ध करून देत आहोत असे मत आमदार यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत अप्पा शेटकार, माजी उपसभापती पद्माकरराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंदराव सुरवसे, तालुका कार्याध्यक्ष भानुदासराव पोटे, तालुका उपाध्यक्ष गणपत आबा कवठे, उपसरपंच विजय मारापल्ले, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ भुले, शहराध्यक्ष शिवशंकरराव हाळे, सरपंच भुजंगराव शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर / ग्रामस्थ आणि पक्षाचे पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते.