विना कागदपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय ट्रॅक्टर चालकांकडून रेती वाहतूक.! प्रशासनाचे दुर्लक्ष?
![विना कागदपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय ट्रॅक्टर चालकांकडून रेती वाहतूक.! प्रशासनाचे दुर्लक्ष?](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66f0f43324fb6.jpg)
प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा
साकोली तालुक्यातील खंडाळा येथे शासकीय रेती घाट आहे.ह्याच रेती घाटातून दिवसभर आसपासच्या गावापासून ते दूर-दूर पर्यंत ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेतीची वाहतूक होत असते.अशातच दि.२२सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास ३ रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर हे खंडाळा येथील रेती घाटातून अर्जुनी- मोरगावकडे जाताना सानगडी जवळच्या पेट्रोल पंप जवळ चौकशी दरम्यान कुठलेही कागदपत्रे व ट्रॅक्टर चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसून, रॉयल्टी पेपरवर ट्रॅक्टर चालकाचे नाव दुसऱ्याचेच व चालक दुसराच असल्याचे रेतीची वाहतूक करताना आढळून आले.
तर ह्या ट्रॅक्टर चालकांमध्ये अल्पवयीन ट्रॅक्टर चालकांचाही समावेश असून, याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष दिसून येत नसल्याने हा प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे.त्यामुळं ह्या प्रकाराकडे संबंधित वरिष्ठ अधिकारी हे लक्ष देऊन कारवाई करतील का?असा मोठा प्रश्नचिन्ह नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे.