आरती व आरोग्य विषयक मार्गदर्शन...

आरती व आरोग्य विषयक मार्गदर्शन...

प्रतिनिधी - बापू चव्हाण नाशिक

ट्रायडेंट हॉस्पिटल तसेच विमल हॉस्पिटलचे संचालक,साक्षी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.विलास देशमुख सर,तसेच डॉ.शिल्पा देशमुख यांनी वडजे क्लासेस दिंडोरी येथे गणपती आरती साठी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना कुठलीही वैद्यकीय मदतीची आवश्यकता लागली तर विमल हॉस्पिटल अथवा ट्रायडेंट हॉस्पिटल दिंडोरी येथे संपर्क साधा . सवलतीच्या दरात अथवा शक्य झाल्यास मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचा प्रयत्न हॉस्पिटल मार्फत करू असे डॉ.विलास देशमुख सर यांनी आश्वासन दिले.

डॉ.शिल्पा देशमुख यांनी विद्यार्थीनी व महिला वर्गाच्या आरोग्य विषयक समस्या साठी मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्यात येतील, कुठल्याही मदतीची आवश्यकता लागल्यास मदतीसाठी नेहमी तत्पर राहु विद्यार्थ्यांनी उपलब्ध सोयी सुविधांचा उपयोग करून उज्वल भविष्याची जडण जडण बालवयात करावी असे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सव निमित्त आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल प्रदान करण्यात आले.याप्रसंगी वडजे क्लासेसच्या संचालिका प्रा.सौ. रोहिणी वडजे,ऋतुजा गायकवाड धनंजय शेळके ,अंकिता उखर्डे,अधिक शिक्षकवृंदांनी  मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.तसेच गणरायाची आरती देखील डॉ.विलास देशमुख यांचे शुभ हस्ते सपत्नीक संपन्न झाली.