दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण

दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

 दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली त्यानंतरआजही दुपारी पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या या तालुक्यात द्राक्ष पिकांसह इतर शेती पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी  नाराजी व्यक्त केली आहे. 

सध्या तालुक्यातील पूर्व भागांमध्ये टोमॅटो, कोबी, सोयाबीन, व इतर शेती पिके काढणीचे काम सुरू असतानाच गेल्या दोन दिवसापासून या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेती पिके धोक्यात आली आहे.काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने सोयाबीन भुईमूग शेतामध्ये काढून ठेवली असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोचावी लागणार आहे.  

पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना द्राक्ष बागेवर रात्रंदिवस महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ आली आहे याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे.कधी ऊन तर कधी पाऊस यामुळे शेतकरी वर्गासह नागरिक देखील हैराण झाले आहेत हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून काही दिवस पाऊस पडणारा असल्याचे सांगण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी संबंधित विभागाने झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.