अखेर प्रतीक्षा संपली.! दिंडोरी तालुक्यात आनंदाचा शिधा वाटप करण्यास सुरुवात...

अखेर प्रतीक्षा संपली.! दिंडोरी तालुक्यात आनंदाचा शिधा वाटप करण्यास सुरुवात...

NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण

नाशिक / दिंडोरी : गेल्या कित्येक दिवसापासून दिंडोरी तालुक्यातील जनता शासनाचा  आनंदशिधा गुढीपाडवा सणाला मिळेल या प्रतीक्षा होते.मात्र गुढीपाडवा होऊन जवळपास एक महिना होऊन ही नागरिकांना आनंद शिदाच्या पुरणपोळीचा आस्वाद घेता आला नाही. त्यामुळे या सणाच्या आनंदावर विरजण पडले होते. त्यानंतर नागरिकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने या शिद्याची ओढ लागली असतानाच तालुक्यात हा शिधा एक महिना उशिरा का होईना उपलब्ध झाल्याने नागरिकांना वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये थोड्या प्रमाणात का होईना नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आनंदाचा शिधा उपलब्ध झाला परंतु तेल आहे तर रवा नाही रवा आहे तर दाळ नाही अशी स्थिती निर्माण झाली होती.मात्र आता उपलब्ध झालेल्या आनंद शिद्यामध्ये शंभर रुपयांमध्ये मिळणाऱ्या एक किलो साखर,एक किलो तेल,एक किलो दाळ,एक किलो रवा,हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आनंद शिधा मिळत आहे. तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज सकाळी सोसायटीचे व्हा. चेअरमन बबन पवार सरपंच रेखा गांगुर्डे पोलीस पाटील सतीश कुमावत यांच्या उपस्थितीत स्वस्त धान्य दुकानदार संजय गुरुळे यांनी कार्डधारकांना शिधा वाटप केला  यावेळी कार्डधारकांनी आपल्या हक्काचा आनंदाचा शिधा घेऊन जावा असे आवाहन गुरुळे यांनी केले.