देहू नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक मुतारीचं गेली चोरीला? प्रशासन मात्र अंनभिज्ञ...
NEWS15 मराठी प्रतिनिधी : आशिष ढगे पाटील
पुणे (देहू) : आज पर्यंत आपण एखादी वस्तू, रोख रक्कम किंवा मौल्यवान दाग-दागिना चोरीला गेल्याचे पाहिलं असेल किंवा अनेकदा ऐकल असेल.! परंतु, देहू नगरपंचायत हद्दीतून चक्क सार्वजनिक मुतारीच चोरीला गेल्याची धक्कादायक बाब; समोर आली आहे. मागील अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेली मुतारी अचानक गायब झाल्याने, देहू गावातील नागरिकांना हा प्रश्न पडला आहे. तर ह्या मुतारीबत देहू नगरपंचायत'ला देखील कोणती माहिती नसल्याचे जाणवत आहे. कारण याबाबत एका सामाजिक संस्थेने पत्र देहून, संबंधित घटनेची माहिती; कर्तव्यदक्ष नगरपंचायत आणि येथील विकासकार्यासाठी नेहमी तत्पर असलेले मुख्याधिकारी श्री. प्रशांत जाधव साहेबांना दिलीय.
परंतु, अनेक दिवस उलटूनही न.पंचायत, देहू आणि अधिकारी साहेबांनी अद्याप कोणतेही उत्तर न दिल्याने; मुतारी बाबत देहू नगरपंचायत'ला खरोखरच माहिती नाही.! कि, अधिकारी आणि नगरपंचायत कोणाला पाठीशी घालत आहे. असा देखील प्रश्न निर्माण होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील देहूगांव हे एक राज्यातील नावलौकिक गाव आहे. याठिकाणी सणावाराला आणि इतर काही महत्वाच्या दिवशी प्रचंड गर्दी पाहावयास मिळते. तर अशा दिवशी नागरिकांची नैसर्गिक क्रियांसाठी गैरसोय होऊ नये; यासाठी देहू ग्रामपंचायत अस्तित्वात असतांना, प्रशासनाने अनेक ठिकाणी सार्वजनिक मुताऱ्यांची सोय केली होती. तर नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील १० ते १२ वर्षापासून ह्या मुताऱ्या योग्य प्रकारे आपली सेवा देत होत्या. परंतु, देहू नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर प्रशासनाच्या झोपाळू आणि दुर्लक्षित कारभारामुळे देहूतील एक मुतारी नामशेष झाली आहे. (पाडण्यात आली आहे.) तर स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ती चोरीलाच गेली आहे.
देहू नगरीतील जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिर परिसरातील ही मुतारी नामशेष झाली आहे. तर या घटनेलाघडून काही महिन्यांचा कालावधी उलटला असूनहि; देहू नगरपंचायत प्रशासन अजूनही निद्राअवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या संदर्भात एका सामाजिक संघटनेने, देहू नगरपंचायत’ला पत्राद्वारे माहिती मागवूनही अद्याप देहू नगरपंचायतने कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे यात देहू नगरपंचायत आणि प्रशासनाचा काही हेतू तर नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.
यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणतीही सरकारी वास्तू पाडायची असेल तर संबंधित विभागाची त्यासाठी मान्यता घ्यावी लागते, जर या मुतारीचे बांधकाम ग्रामपंचायत कार्यकाळात झाले असेल तर, ती वास्तू जीर्ण होण्यासाठी किती अवधी बाकी आहे त्यानुसार त्या संबंधित विभागाकडून त्या वास्तूचे निरलेखन करणे बंधनकारक असते. तसे न करता एखादी वास्तू जीर्ण होण्याअगोदर जर परवानगी विना पाडली तर त्यावर गंभीर अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल होतो हेही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे या मुतारीचे पाडण्यासाठी निरलेखन केले आहे का? ती पाडण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेतली होती का? देहू नगरपंचायत झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यकाळातील अशा वास्तू नगरपंचायतने हस्तानतरित केल्या आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न समोर येत आहे. यावर नगरपंचायत उत्तर देणार कि? फक्त गप्प बसण्याची भूमिका घेणार हेच पहावे लागेल.