मोठी बातमी : खराबवाडी गावातील स्पाईन सिटी वसाहतीत २१ वर्षीय विवाहितेची आत्महत्या...!

मोठी बातमी : खराबवाडी गावातील स्पाईन सिटी वसाहतीत २१ वर्षीय विवाहितेची आत्महत्या...!

News15 मराठी आशिष ढगे पाटील

चाकण : खराबवाडी गावातील स्पाईन सिटी वसाहतीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा गजानन निरवळ (वय-२१ वर्ष) रा. शेलवाडी, ता. शेलू, जि. परभणी असे आत्महत्या केलेल्या नवंविवाहितेचं नाव आहे.

कौटुंबिक कारणातून प्रथमदर्शी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन टिमचे शांताराम गाडे, श्रीकांत बिरदवडे घटनास्थळी पोहचून त्यांनी आतून बंद असलेला दरवाजा खोलून आत्महत्या केलेल्या महिलेला बाहेर काढले. त्यानंतर महाळुंगे MIDC पोलिसांना माहिती देऊन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिस मुल्ला, पोलीस शिपाई हरी शिंदे, दिपक पाटील यांनी पंचनामा करून मृतदेह शवव्हिच्छेदन करण्यासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत..