BREAKING बातमी.! महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपीची; येरवडा कारागृहात आत्महत्या...
![BREAKING बातमी.! महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपीची; येरवडा कारागृहात आत्महत्या...](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_64fd53ad7eeef.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - पुणे
अवघ्या राज्याला हादरवणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीने, येरवडा कारागृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जितेंद्र शिंदे असं ह्या आरोपीचे नाव असून, पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आलय. आज पहाटेच्या सुमारास पोलीस गस्तीसाठी गेले असताना हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आलाय. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. या अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याने पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेत आत्महत्या केली. जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे हा या अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. रविवार( 10 सप्टेंबर) सकाळी त्याने येरवडा कारागृहात बराकीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती देण्यात आलीय.
या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जेल प्रशासन हादरुन गेले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. शिक्षा भोगत असतानाच आरोपीने आत्महत्या केल्याने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.