पावसाची रिमझिम सुरूच.! तर किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी आला संकटात...

पावसाची रिमझिम सुरूच.! तर किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी आला संकटात...

प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

जिल्ह्यात यापूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने, हलक्या प्रतीच्या धान पिकाला धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांपुढे नवीन संकट पुढे येऊन ठेपले आहे. तर या पावसाच्या उच्च प्रतीच्या धानाला फायदा झाला असला तरी धानाला खोडकिडा, गादमासी आदी रोगांनी विळख्यात घातली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

भंडारा जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात सरासरी १लाख ८९ हजार १५५ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली निर्धारित करण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ८२हजार ४२१ हेक्टर मध्ये प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली. त्याची टक्केवारी ९६% आहे. यामध्ये सर्वाधिक लागवड धाम पिकाची १००% लागवड करण्यात आली. धान पिकांचे सरासरी क्षेत्र १ लाख ७२ हजार ६३९ हेक्टर पैकी १ लाख ९२३ हेक्टर मध्ये प्रत्यक्ष लागवड करण्यात आलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी भंडारा जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. शेतकरी राजा सुखावला होता. धान पिकाची उत्पादन होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. धनाला लुंबी देखील फुटलेले असताना शेतकऱ्यांच्या धानाला खोडकिडा,गादमासी आदी रोग लागलेला आहे. आता तोंडाशी आलेला घास फिरवल्यामुळे शेतकऱ्यांचा दसरा, दिवाळी सण कसा साजरा होणार असा प्रश्न पडला आहे. त्यासाठी शासनाने कृषी विभागामार्फत शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी शेतकरी करतात.

▣ कीड फवारणी करून नियंत्रण नाही

शेतकऱ्यांनी ध्यानावर एकरी आठ ते दहा हजार रुपये खर्च करून दोन ते तीन वेळा औषधी फवारणी केली. मात्र धानावरील खोडकिडा गादमासी रोग जात नसल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन कमालीचे घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

▣जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

रविवारी व सोमवारला पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये काही खुशी काही गमचा माहोल दिसत होता. हवामान खात्याने पुन्हा ऑरेंज कलर दिल्याने फुलोऱ्यावर व निस्व्यावर असलेला धान उत्पादकांची धाकधूक वाढली आहे.