दिंडोरीच्या बालभारती पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान दिन.! विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग...
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी येथील नामांकित शाळा बालभारती पब्लिक स्कूल येथे आज शुक्रवार दि.२८ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रात्यक्षिकांची आयोजन केले. सोनाली कानमहाले यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तसेच बालभारती पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभदा कुलकर्णी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली.
विज्ञान विषयाशी निगडीत व पर्यावरण पूरक अशा नवनवीन संकल्पनांवर आधारित विज्ञान प्रात्यक्षिक तसेच प्रकल्प आणि विविध प्रतिकृतींचे अतिशय उत्तम रित्या सादरीकरण केले. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक साधनांचा वापर करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रकल्पांचे सादरीकरण केले.विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.यावेळी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक देखील करून दाखवले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू (तात्या) चव्हाण, यस मराठीचे कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ पत्रकार अमोल जाधव गोरख जाधव यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे चेअरमन प्रीतम देशमुख मुख्याध्यापिका सुभद्र कुलकर्णी यांनी बालभारती पब्लिक स्कूलच्यावतीने मान्यवरांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांनी आपल्या उपकरणाची माहिती देत उपस्थितांचे मन जिंकली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन प्रीतम देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सुभद्रा कुलकर्णी विज्ञान विषय शिक्षक गुलनार सय्यद,सौरभ वडजे,पुनम डोके, जयश्री निरभवणे तसेच सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले यावेळी पालक माता मोठ्या संख्येने उपस्थित होते.