बी.पी.पाटील विद्यालयात समीक्षा कदम पहिली...
![बी.पी.पाटील विद्यालयात समीक्षा कदम पहिली...](https://news15marathi.com/uploads/images/202405/image_750x_6650b88663d72.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
पिंपळगाव येथील कै. बी.पी.पाटील जूनियर कॉलेज ऑफ सायन्स विद्यालयाने यंदाही यशाची परंपरा कायम राखत यावर्षीही विद्यालया चा शंभर टक्के निकाल लागला असून यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे त्यामध्ये कोराटे येथील समीक्षा अंबादास कदम हिने ( ९३ टक्के) गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला.
यावर्षी कॉलेजमध्ये एकूण ६१७ विद्यार्थी उच्च माध्यमिक परीक्षेसाठी बसले होते.त्यापैकी ४१ विद्यार्थी ९० पेक्षा जास्त गुण मिळून उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना कॉलेजचे संचालक दिनेश अनारसे प्राचार्य प्रकाश भंडारे उपप्राचार्य योगेश्वर शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.कदम हिच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.