ग्रामीण विद्यार्थ्यांची गुणवत्ता नेत्रदीपक - खासदार भगरे...
![ग्रामीण विद्यार्थ्यांची गुणवत्ता नेत्रदीपक - खासदार भगरे...](https://news15marathi.com/uploads/images/202406/image_750x_66671edab99c0.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
ग्रामीण भागातील विद्यार्थी परिश्रमाबरोबरच अभ्यासातही मागे नाहीत इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये शहरांचे तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवलेले असून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते नक्कीच संधीचे सोने करतात असे प्रतिपादन दिंडोरी मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी निळवंडी येथे केले.
निळवंडी येथील अर्जुन भास्कर पाटील या विद्यार्थ्याने एस.एस.सी परीक्षेत दिंडोरी येथील मविप्र संस्थेच्या आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ९५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल खासदार भगरे यांचे हस्ते अर्जुन पाटील याचा सत्कार करण्यात आला.आजही सर्व क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ग्रामीण विद्यार्थी पुढे आहेत असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सुनील शेटे,छबु मटाले,बी.के.गायकवाड,रघुनाथ गायकवाड,चंद्रकांत गायकवाड नळवाडपाडाचे सरपंच हिरामण गावित,प्रा.नारायण पाटील,भास्कर पाटील,सौ.आशा पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.