फेसबुकवरून झाली मैत्री.! आणि शिक्षिकेला फसवले तब्बल १२ लाख रुपयांना...
![फेसबुकवरून झाली मैत्री.! आणि शिक्षिकेला फसवले तब्बल १२ लाख रुपयांना...](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_64fc241c29162.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - आकाश वालदे, गोंदिया
फेसबुकवर मैत्री करणारा ब्राझील येथील मूळचा व अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका मित्राने; शिक्षिकेला महागडे गिफ्ट पाठविण्याचे सोंग करून, लाखो रुपयांना गंडा घातला आहे. तर त्याच्या या नाटकात इतर तिघांचा समावेश होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिकेचे फेसबुक वर अकाउंट असून, जून २०२३ मध्ये त्या शिक्षिकेची जॅक्सन जेम्स या तरुणाची मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर जॅक्सन जेम्स या तरुणाने माझा वाढदिवस आहे मी तुम्हाला गिफ्ट पाठवतो; तुमचा पत्ता सांगा असे म्हणत.! शिक्षेकडून पत्ता मागविला व त्या पत्त्यावर गिफ्ट पाठविल्याचे नाटक केले. पहिल्यांदा शिक्षिकेकडून कस्टम क्लिअरन्स चार्जेसच्या नावावर ७५ हजार रुपये मागितले. त्यानंतर नो-ड्रग्ज सर्टिफिकेट व नो-टे- ररिस्ट सर्टिफिकेटकरिता ७ लाख ६० हजार रुपये पाठविण्यास सांगितले. परंतु त्यांच्याकडे पैसे कमी असल्याचे सांगत शिक्षिकेने ६ लाख ६० हजार रुपये पाठविले.
त्यानंतर अदनान मोहिंदर याने पुन्हा व्हॉट्सअॅपवर मॅसेज करुन तुमच्या पार्सलमध्ये अतिशय महागड्या वस्तू आहेत. त्यासाठी तुम्हाला त्या वस्तूंच्या किमतीच्या १० टक्के १५ लाख ४५ हजार रुपये चार्जेस पेड़ करावे लागतील असे सांगितले. त्यानंतर शिक्षिकेने १४ जून रोजी २ लाख ३० हजार व १५ जून रोजी २ लाख ७० हजार रुपये चेकद्वारे अदनान मोहिंदर याने पाठविलेल्या अकाऊंटवर पैसे पाठविले; असे एकूण १२ लाख ३५ हजार ६०० रुपये त्यांच्याकडून उकळून त्यांची फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याची लक्षात येतात या शिक्षिकेने गोरेगाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी भांदवीच्या कलम ४२०, ३४ सह कलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत.