सांगुर्डी गावात कोयतावार, दारूच्या बाटल्यांवरून जंगी मारामारी...!

सांगुर्डी गावात कोयतावार, दारूच्या बाटल्यांवरून जंगी मारामारी...!

News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : सांगुर्डी गावात दारूच्या बाटल्या इथे का टाकल्या म्हणून ३ आरोपींनी एकावर कोयत्याने वार करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून २०२३ रोजी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास फिर्यादी चंद्र्कांत मारुती भसे(वय-५५ वर्षे) हे स्वत:च्या शेतात सांगुर्डी गावाच्या हद्दीत शेळ्यासाठी शेतातील हत्ती गवत कापण्यासाठी कोयता घेऊन गवत कापत होते. फिर्यादीच्या शेताच्या बांधाच्या बाजूला दारूच्या बाटल्या तसेच काचा पडलेल्या होत्या. त्यावरून त्यांनी आरोपी चेतन भसे, अनिल भसे, अजित भसे सर्व रा. सांगुर्डी यांना फिर्यादीने माझ्या शेतात दारूच्या बाटल्या का टाकता? या बाबत विचारणा केली.

यावर तीनही आरोपींनी फिर्यादिस शिवीगाळ व अंगावर धावून जाऊ लागले. आरोपी अजित हिरामन भसे याने तेथे पडलेले लाकूड उचलले व आरोपी अनिल भसे याने तेथे पडलेले कौल उचलले व ते सर्व जण मिळून फिर्यादिस मारण्यास अंगावर धावून गेले. त्यातील आरोपी चेतन सुनील भसे याने फिर्यादिस ढकलून दिले त्यावर फिर्यादी जमिनीवर खाली पडले असता आरोपींनी फिर्‍यादीच्या हातातील गवत कापण्याचा कोयता हिसकावून घेऊन फिर्यादीच्या डोक्यात दोन वेळा वार करून फिर्यादिस गंभीर दुखापत करून फिर्यादिस सर्व आरोपींनी शिवीगाळ करून तेथून पळ काढला. या घटना घडल्यानंतर फिर्‍यादीने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीनही आरोपींच्या विरोधात भा. द. वि. कलम ३२६, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल आहे. तीनही आरोपींना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता भंडारवाड या करत आहेत.