तिरोडा तालुक्यातील ग्राम मेंढा येथे खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन...

तिरोडा तालुक्यातील ग्राम मेंढा येथे खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते  विविध विकास कामांचे भूमिपूजन...

NEWS15 प्रतिनिधी - साहिल रामटेके

गोंदिया - जिल्ह्यातील तिरोडा तालुका अंतर्गत येत असलेल्या मेंढा येथील आरोग्य केंद्राचे अखेर खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे कामाचे भूमिपूजन देखील खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले.

मेंढा येथील आरोग्य वर्धिनी केंद्राची ईमारत गेल्या ०३ वर्षापासून बनून तयार होती मात्र पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण व्हावे याकरिता सुमारे तीन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र लोकार्पणाचा मुहूर्त मिळाला नाही. परिणामी परिसरातील नागरिकांना वेळेत आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या. अखेर खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते मेंढा येथील आरोग्य वर्धिनी केंद्राचे लोकार्पण पार पडले. यावेळी आमदार विजय रहांगडाले , जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले आदी उपस्थित होते.