नागरिकांनो काळजी घ्या.! दिंडोरी तालुक्यात डोळ्यांच्या साथीला सुरुवात...
![नागरिकांनो काळजी घ्या.! दिंडोरी तालुक्यात डोळ्यांच्या साथीला सुरुवात...](https://news15marathi.com/uploads/images/202307/image_750x_64c4f289932d0.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण
नाशिक / दिंडोरी : गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये डोळ्यांच्या साथीने थैमान घातल्याने आता हळूहळू ही डोळ्यांची साथ दिंडोरी तालुक्यात येत असून नागरिकांचे डोळे येण्यास सुरुवात झाली आहे.याबाबत नागरिकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुभाष मांडगे यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी तालुक्यात नाशिक प्रमाणे डोळ्यांची साथ येत असल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त करण्यात येत आहे.सध्या तरी या साथीचे तुरळक रुग्ण आढळून येत असल्याने याचा बचाव करण्यासाठी रुग्ण शासकीय आणि खाजगी रुग्णालयात या संसर्गजन्य आजारामुळे डोळ्यांची तपासणी करून घेत आहे.यामुळे आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला तज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे. अस्वच्छतेमुळे व वातावरणामुळे या आजाराने हातपाय पसरवल्याचे बोलले जात आहे.डोळ्यांचा आजार हा संसर्गजन्य असल्याने आरोग्य विभागापुढेही आव्हानच आहे.डोळे लाल होणे,डोळ्यातून पाणी येणे, चिपडे येणे, डोळ्यांना खाज सुटणे, सकाळी उठल्यावर डोळे न उघडणे, पापण्यांवर सूज येणे, अंधुक दिसणे, आधी विविध प्रकारची लक्षणे डोळ्यांचा आजार झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येतो ,अ? डिनोव्हायरस हे विषाणू अस्वच्छतेमुळे वाढल्याने हा आजार पसरत आहे. तसेच खोकला आणि स्पर्श अशा विविध कारणांनी हा आजार पसरत असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
दिंडोरी शहरात व ग्रामीण भागात या आजाराची लागण होत असल्याने हळूहळू रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्या आधीच संबंधित विभागाने यावर उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.
चौकट...
डोळे आल्यास शक्यतो काळा चष्म्याचा वापर करावा,दिवसातून कमीत कमी चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने डोळे धुवणे,डोळ्यात ड्रॉप्स मलम वापरताना हात स्वच्छ धुवावे, डोळ्यान करता वापरलेले रुमाल गरम पाण्याने स्वच्छ धुवावे, त्याचप्रमाणे डोळे आलेल्या व्यक्तीचे कुठलेही साहित्य वापरू नये,शक्यतो घरी राहावे,गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, ज्यांना आजार आहे त्यांनी इतरांपासून दूर राहावे,जीवनसत्वयुक्त आहार घ्यावा,औषधोपचारासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,असे आव्हान तालुका वैद्यकीय अधिकारी सुभाष मांडगे यांनी केले आहे.