किसान समृद्धी केंद्राचा लाभ घ्या - केंद्रीय मंत्री भारतीताई पवार
![किसान समृद्धी केंद्राचा लाभ घ्या - केंद्रीय मंत्री भारतीताई पवार](https://news15marathi.com/uploads/images/202307/image_750x_64c4d8ee5551a.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण
दिंडोरी : शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे औषधे, खते अवजारे यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते. मात्र, आता प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र ही योजना शेतकऱ्यांना यासर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरवण्यासाठी सुरू करण्यात येत आहे.
सध्या तालुका व ग्रामीण पातळी खतांची किरकोळ विक्री करणारी (रिटेल शॉप) केंद्राचे रूपांतर वन स्टॉप शॉप मध्ये होणार आहे. तसेच पंतप्रधान मंत्री किसान समृद्धी केंद्राच्या माध्यमातून ८.५ करोड पीएम किसान लाभार्थी यांना १४ व्या हप्त्याचे हस्तांतरण नुकतेच झाले आहे. या केंद्राचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र ही योजना शेतकऱ्यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. सध्या देशभरातील एक लाखाहून अधिक खत विक्री केंद्राचे रूपांतर पंतप्रधान प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रकडे केंद्रामध्ये करण्यात आले आहे.उर्वरित १.८ लाख खत विक्री दुकानदारांचे रूपांतर यावर्षा अखेरीस किसान समृद्धी केंद्रांमध्ये करण्यात येणार आहे.