मोठी बातमी : वाकड पोलिसांची मोठी कामगिरी : दोन सराईत गुन्हेगारांना पिस्टल व जिवंत काडतुसासह अटक..

News15 मराठी प्रतिनिधी विश्वनाथ केसवड पुणे
पिंपरी चिंचवड: पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व समाजात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात वाकड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कस्पटे चौकाजवळ सापळा रचून दोघांना देशी बनावटीच्या पिस्टल व जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे प्रणव प्रकाश शेवाळे (वय २०, रा. थेरगाव) व औदुंबर ऊर्फ मोन्या रविंद्र बाकते (वय २९, रा. गोखले बगर) अशी आहेत. या दोघांकडून देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस, एकूण किंमत अंदाजे ₹५२,००० जप्त करण्यात आले आहे.
सदर कारवाई ९ जून २०२५ रोजी करण्यात आली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६१/२०२५ नुसार भारतीय शस्त्र अधिनियम १९५९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना १३ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी:
१. प्रणव प्रकाश शेवाळे:
– वाकड पो.स्टे. गु.र.नं. २७७/२०२४ – चोरी
– गु.र.नं. १९५/२०२४ – आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा
२. औदुंबर ऊर्फ मोन्या रविंद्र बाकते:
या आरोपीवर चतुश्रृंगी, हिंजवडी, पौड आदी पोलीस ठाण्यांमध्ये १० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये हत्या, खूनाचा प्रयत्न, जबरदस्ती, धमकी, शस्त्रधारी गुन्हे इत्यादींचा समावेश आहे.
पोलीस आयुक्त मा. विनय कुमार चौबे, सह आयुक्त मा. डॉ. शशीकांत महावरकर, अपर आयुक्त श्री. सारंग आवाड, परिमंडळ २ चे उपायुक्त श्री. विशाल गायकवाड, वाकड विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम राबविण्यात आली.
संपूर्ण कारवाईत वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सपोनि सुभाष चव्हाण, पोउपनि अनिरुद्ध सावर्डे, श्रेणी पोउपनि बीभीषण कन्हेरकर, तसेच पोलीस कर्मचारी वंदु गिरे, संदिप गवारी, कौतेंय खराडे, तात्यासाहेब शिंदे, नामदेव वडेकर, विजय भुसारे, सचिन गायकवाड, विजय घाडगे, दिपक साबळे यांनी परिश्रम घेतले. पुढील तपास पोउपनि अनिरुद्ध सावर्डे हे करत आहेत.