पुष्पा स्टाईल चंदन तस्करी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.! 2 आरोपींसह 9 कोटीचा मुद्देमाल हस्तगत...

प्रतिनिधी - राजेश देवडकर, PCMC
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (शहर) मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने; काल सायंकाळी पुणे - मुंबई एक्सप्रेस'वे वरील उर्से टोल नाक्याजवळ पुष्पा स्टाईल रक्त चंदनाची तस्करी करणारा एक कंटेनर पकडला असून, दोन आरोपींना बेड्या ठोल्यात.
मिळालेल्या माहितीनुसार; या कंटेनर'मधे पोलिसांना अंदाजे 12 टन वजनाच्या रक्त चंदनाची लाकडे आढळून आली असून, ज्याची बाजारात 9 कोटी पेक्षा अधिकची किंमत आहे.
पोलिसांनी गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार हा कंटेनर पकडला असून, यात ट्रक चालक रामदास गाईके आणि हरप्रीत बदाना या दोघांना ताब्यात घेतलं आहे. तर या प्रकरणी शिरगाव परंदवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथक करत आहे.