मोठी बातमी : महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी मोटार सायकल चोरी करणा-या गुन्हेगाराकडुन मोटार सायकल चोरीचे एकुण ०३ गुन्हे उघड...!

मोठी बातमी : महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी मोटार सायकल चोरी करणा-या गुन्हेगाराकडुन मोटार सायकल चोरीचे एकुण ०३ गुन्हे उघड...!

News15 मराठी आशिष ढगे पाटील 

महाळुंगे इंगळे : महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटार सायकल चोरीवर आळा घालण्याकरिता गुन्हयांचे क्राईम मॅपिंग करुन, नाकाबंदी, पेट्रोलिंग करुन तसेच मोटार सायकल चोरीच्या घटना घडलेल्या घटनास्थळावरील सी सी टि व्ही फुटेज पडताळणी करुन गुन्हेगारांचा शोध घेउन मोटार वाहन चोरीच्या गुन्हयांची उकल करून एकूण चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आणून महाळुंगे MIDC पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.  

महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. दिगंबर सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग व वेगवेगळया ठिकाणी अचानक नाकाबंदी करून तसेच घटना घडलेल्या ठिकाणी सीसीटिव्ही फुटेज पाहुन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार निघोजे गावच्या हद्दीत असलेल्या महींद्रा कंपनी समोरुन दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी मोटारसायकल चोरीची घटना घडल्याबाबतच्या तक्रारी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील सी सी टि व्ही फुटेज पाहणी केली. तसेच घटनास्थळाचे आजुबाजुस सी सी टी व्ही फुटेज तपासनी करून संशयीत रित्या वावरणा-या इसमाची माहीती प्राप्त करत तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे चोरीचा गुन्हा आरोपी संदिप महादेव दिवटे( वय २२ वर्षे रा. खालुंबे, ता. खेड, जि. पुणे मुळ रा. सातोना, ता. परतुर, जि. जालना) याने केला असल्याचे निष्पन्न केले. तपास पथकाने त्यास आडगांव, नाशिक येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडे कसून तपास केला असता त्याने सराईतपणे पुणे परीसरातुन होंडा शाईन कंपनीच्या आणखी तीन मोटारसायकल चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्याचेकडुन ७५,०००/- रुपये किंमतीच्या तीन मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या असुन उर्वरीत १ मोटार सायकल बाबत तपास महाळुंगे MIDC पोलीस करत आहेत.

आरोपी संदिप महादेव दिवटे यांच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यासह शिवाजीनगर पोलीस ठाणे,पुणे, फरासखाना पोलीस ठाणे, पुणे अशा विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सध्याची महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यातील पोलिसांची धडाकेबाज कारवाई पहाता परिसरातील चोरीच्या घटना घटल्याचे दिसून आले आहे. या कारवाईचे महाळुंगे MIDC पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. 

सदरची कारवाई सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवड, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३. बापु बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल देवडे, सहा. पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, सहा. पो. फौ. राजू कोणकेरी, राजु जाधव, पो. हवा. अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, युवराज बिराजदार, किशोर सांगळे, अशोक जायभाये, तानाजी गाडे, पोना संतोष काळे, पोकों / राज हनमंते, राजेश गिरी, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, शुभम खंडागळे, शरद खैरे यांनी केली आहे.