काळानुरूप शिक्षण क्षेत्रात बदल होणे आवश्यक.! नवीन शिक्षण धोरण आणले जाईल - शिक्षण मंत्री दादा भुसे
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
काळानुरूप शिक्षण क्षेत्रात बदल होणे आवश्यक असून रोजगाराभिमुख शिक्षणाची गरज आहे त्यादृष्टीने पावले उचलले जात असून ओवकर नवीन शिक्षण धोरण आणले जाईल असे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले.
दिंडोरी येथील मविप्र संस्थेचे जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे नूतन प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन शिक्षणमंत्री दादा भुसे,अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांचे हस्ते झाले त्यावेळी भुसे बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे होते.
पुढे बोलताना भुसे यांनी हिवाळी येथील शाळेचे शिक्षक यांनी आदर्शवत चालवलेल्या जिप शाळा व तेथील उपक्रमाचे कौतुक करत जिप शाळांचे विकासासाठी सर्वांनी हातभार लावण्याचे आवाहन केले.शिक्षकांची भरती व त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत दिंडोरी विद्यालयासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासित केले.
यावेळी बोलताना मंत्री झिरवाळ यांनी मविप्र संस्था समाजातील सर्व घटकांना आदर्शवत शिक्षण देत असून मी याच शाळेत घडलो शाळेचे इमारतीसाठी स्वतःचे सहा महिन्याचे मानधन देण्याचे सांगत संस्थेच्या विविध शाखांना जोडणारे रस्ते पूल यांचे प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले.आपल्याला मिळालेले खाते हे प्रत्येकाचे आरोग्य आयुष्याचे दृष्टीने महत्वाचे असून यातील भेसळ दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकासाला संधी असून मोठे प्रकल्प आणण्याचे प्रयत्न केले जात आहे.नाशिक दिंडोरी वणी रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार असे सांगितले.

कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे,संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे,अध्यक्ष सुनील ढिकले सभापती बाळासाहेब क्षीरसागर चंद्रकांत राजे,नरेश देशमुख यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षण क्षेत्रातील विविध अडचणी विषद करत त्या सोडविण्याची मागणी केली.संचालक प्रवीण जाधव यांनी प्रास्ताविक करत लेखाजोखा मांडला.यावेळी खासदार भास्कर भगरे,सह्यादीचे अध्यक्ष विलास शिंदे,माजी आमदार धनराज महाले,संस्थेचे सर्व पदाधिकारी,माजी संचालक संपतराव घडवजे गणपतराव पाटील,नरेंद्र जाधव शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे,दत्तात्रेय जाधव दौलत उखर्डे,बाळासाहेब जाधव,शिवाजीराव जाधव,दिलीप जाधव नगरपंचायत अध्यक्ष सुनीता लहानगे उपाध्यक्ष शैला उफाडे सर्व नगरसेवक आदींसह शालेय समिती सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.स्वागत संचालक प्रवीण जाधव यांनी तर आभार प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले.