गोंदिया कोहमारा मार्गावर तलावाचे स्वरूप, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष?
![गोंदिया कोहमारा मार्गावर तलावाचे स्वरूप, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष?](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_651654bbe4a9b.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके, गोंदिया
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी - कोहमारा मार्गावर नियमित वाहनांची वर्दळ राहते; तर गेल्या 3-4 दिवसाअगोदरच्या झालेल्या जोरदार पावसामुळे कोहमारा - सडक अर्जुनी, गोंदिया या मार्गावर तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते.
त्यामुळे वाहन धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असतो. तसेच ह्या मार्गावर येणाऱ्या पाऊसामुळे तर ट्राफिक देखील जाम होत असते. असे असले तरी स्थानिक प्रशासनाने यावर अद्याप उपाय योजना केली नाही. त्यामुळे पायदळ व वाहनाने चालणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळं तात्काळ नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.