मेळगाव, धंनज येथे अवजड वाहणाने रेती वाहतूक चालू.!

मेळगाव, धंनज येथे अवजड वाहणाने रेती वाहतूक चालू.!

NEWS15 प्रतिनिधी : शिवराज होनशेटे

नांदेड : नायगाव  तालुक्यातील मेळगाव, धंनज  बळेगाव येथून  रेती वाहतूक टेंडर घेण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालय येथील महसूल  विभागाचे अव्व्ल कारकून श्री. गादेवार यांनी दिली आहे. सदर रेती ही शासनाकडून 250 ब्रासची परवानगी  दिली असून, ही रेती फक्त टिपर आणि ट्रॅक्टरच्या साय्याने वाहतूक करण्याची अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. मात्र वाळू व्यवसायिकानी शासनाचे नियम न जुमानता अति जोमाने हायवाच्या साह्याने रेती वाहतूक करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नवीन  डांबरीकरण  केलेल्या रस्त्याचा चकणाचूर  होत आहे.

सदर रस्ते गेल्या 25 वर्षपासून प्रयत्न केल्याने निधी  मिळाला आहे. तरी त्या रस्त्याच्या कामात देखील सारवा सारव कसे बसे बनविले आहे. मात्र या रस्त्यावरून हायवा सात/सात ब्रास रेती वाहतूक करत असल्याने सदर रस्ता पुन्हा जैसे थे वैसे म्हणण्याची वेळ आता या गावाकऱ्यावर आली आहे. सदर रस्तावरून हायवा बंदी  करण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी बिपीन इटणकर व आमदार राजेश पवार  यांनी धंनज, मेळगाव, सांगवी या रस्तावरून हायवा वाहतूक बंद करण्यात यावे असे आदेश  दिले होते.

त्याचबरोबर आमदार राजेश  पवार  यांनी विधानसभेत देखील रस्त्यासंदर्भात मुद्धा मांडले होते कि.! सदर रस्त्यावरून हायवा बंद अवैध रेती यासह अवैध वाहतूक बंद करण्यात यांनी अशी मागणी केली होती. पण रेती व्यावसायिक यांनी शासनास न जुमानता; अति जोमाने व बिनधास्तपने हायवाच्या साह्याने रेती वाहतूक करत आहे. सदर बाबीची माहिती गावाकऱ्यांनी प्रशासनास वेळोवेळी देऊन देखील महसूल विभागातील अधिकारी, तहसीलदार, कर्मचारी जाणून बुजून  दुर्लक्ष केल्याची खंत  गावाकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सदर रेती अवजड वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी आता गावकरी करत आहे. अन्यथा पुढील योग्य तो पाऊले उचले  जातील असा इशारा देण्यात आला आहे.