आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ५३ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ...

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ५३ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ...

NEWS15 प्रतिनिधी : असलम शेख

लातूर : अहमदपुर तालुक्यातील शिरूर ताजबंद ग्रामपंचायतच्या विविध विकासकामांचा शुभारंभ ; आमदार बाबासाहेब पाटील आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत शिरूर ताजबंद ग्रामपंचायत विकासकामांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले. तसेच गावची एकता अबाधित ठेवत गावचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर द्यावा असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

ग्रामपंचायत विकासकामांमध्ये गंगाधर चव्हाण यांच्या घरासमोरील नाली बांधकाम : १० लक्ष रुपये, इस्लामपूर सिमेंट रस्ता : १० लक्ष रुपये, उदगीर रोड ते समता नगर रस्ता १० लक्ष रुपये, दलित वस्ती सभागृह बांधकाम : २० लक्ष रुपये, शेख पाशा व गोविंद कापसे यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता व नाली बांधकाम : ३ लक्ष रुपये आदींचा समावेश आहे.

कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच साहेबराव जाधव, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुभाषराव पाटील, प्रताप उर्फ बंडू पाटील, सरपंच मच्छिंद्र वाघमारे, उपसरपंच सुरजभैय्या पाटील, ग्रामपंचायत सदस्य युवराजभैय्या पाटील, अनिल लामतुरे, ग्रामपंचायत सदस्य किशन कापसे, अभिषेक बिल्लापट्टे, ग्रामपंचायत सदस्य शुभम सारोळे, धर्मपाल सरवदे, ज्ञानोबा बडगिरे, कोंडीबा पडोळे, माधवराव सरवदे, गोविंदराव कापसे, बालाजी पडोळे, शिवचंद्र गुरमे, बाबुराव उडतेवार, डॉ. देशमुख, गंगाधर ताडमे, डॉ.कापसे, शामराव टिकोरे, इस्माईल कीनिवाले, विश्वनाथ जाधव, ईश्वर भुतडा, अविनाश गर्डे, कासले, राहुल तेलगाने, चांद कीनिवाले शार्दुल शेख, नवनाथ वाघमारे शिरूर ताजबंद ग्रामस्थ उपस्थित होते.