कादवा सहकारी साखर कारखान्यास मा. पेट्रोलियम मंत्री रामेश्वरम तेली यांची भेट...

कादवा सहकारी साखर कारखान्यास मा. पेट्रोलियम मंत्री रामेश्वरम तेली यांची भेट...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

नाशिक जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखान्यास माजी केंद्रीय पेट्रोलिय मंत्री रामेश्वरम तेली (आसाम) यांनी भेट देत साखर कारखाना व इथेनॉल आसवानी प्रकल्पाची माहिती जाणुन घेतली व दोन्ही प्लांन्ट ला भेट देवुन समाधान व्यक्त केले.नाशिक जिल्हात सहकारी तत्वावर एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना सुरु असल्याने त्यांनी कारखान्याचे विशेष कौतुक केले. यावेळी साखर कारखान्याचे प्रश्न संसदेमध्ये मांडन्याचे प्रयत्न करणार असे आश्वासन दिले.कादवा साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे व संचालक मंडळाचेवतीने अधिकारी यांनी रामेश्वर तेली यांचे स्वागत केले.

चेअरमन श्रीराम शेटे यांनी सहकारी साखर कारखान्यांची वाटचाल व विविध अडचणींवर चर्चा करत साखर उद्योगाच्या भरभराटीसाठी विविध उपाययोजना सुचवल्या.प्र.कार्यकारी संचालक, विजय खालकर यांनी कारखान्याच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. यावेळी कारखान्याचे प्रशासकिय सल्लागार बाळासाहेब उगले,सचिव राहुल उगले,चीफ अकौंटट सत्यजित गटकळ,वैद्यकिय अधिकारी प्रदिप तिडके,ऋषिकेश दंवगे आदी अधिकारी उपस्थित होते.