जैन बंधू भगिनींचे बालवयात असलेले व्यवसाय मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी - प्रवीण नाना जाधव
![जैन बंधू भगिनींचे बालवयात असलेले व्यवसाय मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी - प्रवीण नाना जाधव](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66bc7811e73ca.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण नाशिक
दुबईत वास्तव करणारे कु. जैनम जैन व कुमारी जिविका जैन या१० व ११ वर्षाच्या मुलांनी शिक्षणसोबतच बालवयातच व्यवसाय सुरू करून त्यास बहर आली असल्याने हे दोघेही बंधू भगिनी विद्यार्थ्यांसाठी भारतभर करियर मार्गदर्शन करत असून यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मविप्र चे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी केले.
दिंडोरी येथील राजे बॅकवेट हॉल मध्ये जैनम धीरज जैन ,कुमारी जिविका धीरज जैन व त्यांच्या मातोश्री सौ ममता जैन यांच्या वतीने बालवयात व्यवसाय सुरू करता येतो.याचा अनुभव सोबत घेऊन देशभरातील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करत आहे.या मार्गदर्शन कार्यक्रमप्रसंगी प्रवीण नाना बोलत होते.ते पुढे म्हणाले दिंडोतील जेष्ठ मार्गदर्शक व उद्योजक अशोकशेठ बागमार यांच्या पुढाकाराने बालवयातील जैन बंधू भगिनी चा मार्गदर्शन कार्यक्रम ग्रामीण व अधिवासी भागातील विद्यार्थ्यांना भविष्यात मार्गदर्शक ठरेल व नोकरीच्या मागे न लागता विद्यार्थ्यांनी व्यवसाय व उदयोग याकडे लक्ष द्यावे असेही आव्हाहन प्रवीण जाधव यांनी केले.
व्यासपीठावर बालभारती पब्लिक स्कुलचे संस्थापक प्रीतम देशमुख,जेष्ठ उद्योजक अशोक बागमार,सौ.ममता जैन,कुमार जैनम जैन,कुमारी जिविका जैन,अभय सुराणा,मानकचंद सुराणा,किशोर बाफना,संदीप शेटे,दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलचे उपप्राचार्य उत्तम भरसठ,रावसाहेब उशीर,प्रा. कुलकर्णी,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय व बालभारती पब्लिक स्कुलचे एकूण १६०० विद्यार्थ्यांना यावेळी दोन्ही जैन बंधूनी करिअर मार्गदर्शन करून विज्ञानातील घडामोडी व प्रात्यक्षिक प्रयोग करून दाखविले.सौ.ममता जैन यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व खरोखरच आपणही शिक्षण घेत असताना व्यवसाय कसा करू शकतो याची माहितीही त्यानी दिली.उपस्थित विद्यार्थ्यांनाही चर्चेत सहभागी करून मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.जैनम व जिविका या दोघांचा व त्यांच्या मातोश्रीचा शाल गुच्छ देऊन मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे व संचालकमंडळाने या भाऊ बहिणीचे कौतुक करत त्यांच्या आई वाडीलांचेही आभार मानले. व या मुलांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल अशी आशा शेटे यांनी व्यक्त केली.सूत्रसंचालन व आभार संतोष कथार यांनी मानले.