पिंपरी चिंचवड पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई.!

पिंपरी चिंचवड पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई.!

 प्रतिनिधी - विश्वनाथ केसवड

पिंपरी चिंचवड : अंमली पदार्थ विरोधी पथकाने दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी पिंपरीगावातील पवनेश्वर पान स्टॉलजवळ मोठी कारवाई करत, रोहित अमृतलाल मौर्य (वय २३) या युवकाला रंगेहाथ अटक केली.

पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल ₹३९,५७५ किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ, तसेच गुटखा बनवण्यासाठी वापरले जाणारे मशिन व पॅकिंग मशिन जप्त केले.

राज्य शासनाने तंबाखूजन्य उत्पादने आणि गुटखा विक्रीवर बंदी घातली असतानाही आरोपीने अवैध विक्री चालवली होती. या उत्पादनांमुळे मुखाचा कर्करोग आणि इतर गंभीर आजार होतात, हे माहित असूनही आरोपीने नफा कमावण्यासाठी लोकांच्या आरोग्याशी खेळ केला.

या प्रकरणात आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२३, २७१, २७२, २७४, २७५, २२३ आणि सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ च्या कलम २० (१)(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.