देहू नगरपंचायत प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत गंभीर आहे का.? शहरात कचऱ्याचे साम्राज्य...

देहू नगरपंचायत प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत गंभीर आहे का.? शहरात कचऱ्याचे साम्राज्य...

NEWS15 प्रतिनिधी : राजेश देवडकर

श्री क्षेत्र देहू / पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्य भूमी.! श्री क्षेत्र देहूगांवच्या सर्वांगीण विकासासाठी, देहू ग्रामपंचायतचे देहू नगरपंचायत मध्ये रुपांतर झाले. एकंदरीत देहूगावची वाढती लोकसंख्या आणि ग्रामपंचायतवरील वाढता ताण पाहता.! आणि नागरिकांना अधिक सुख सुविधा उपलब्ध होतील या हेतूने, शासनाचे हा निर्णय घेतला असवा. परंतु, देहू शहरातील सोयी सुविधा आणि नागरिकांच्या आरोग्याच्या बाजूने विचार केला तर; हे चित्र फारसे बदललेलं दिसत नाही.

कारण.! आजही देहू शहरातील मुख्य भागांमध्ये आणि रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे आढळून येतं आहेत. यात ओला, सुखा आणि प्लास्टिक मिश्रित कचरा रस्त्यांवर आणि कडेला अस्थवेस्थ पडलेला आपल्याला आढळून येतोय. शहरात म्हणावे त्या प्रमाणत प्रशासनाने कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व नियोजन न केल्याने, यामुळे नागरिकांच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं देहू नगरपंचायत प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत गंभीर आहे का? असा प्रश्न विचारायची वेळ नागरिकांवर आली आहे.

देहू शहरातील.! देहू-आळंदी रोड, PMPML बस स्थानक जवळील घाट, गाथा मंदीर शेजारील मोकळ्या जागेत आणी गॅस गोडाऊन कडे जाणारा मार्ग, तर विशेष म्हणजे नगरपंचायतचे जुने कार्यालय होते त्या समोर देखील कचऱ्यांचे ढिगारे आजही मोठ्या प्रमाणात आढळून येतात. गाथा मंदीर परीसरात (बाहेरील ठिकाणी) महीला व पुरुष भाविकांसाठी स्वच्छता गृह किंवा इतर सुविधांची उपलब्धता नसल्याने, वारकरी मंडळी उघड्यावरच शौचालयाला बसतात. तर तेथील छोट मोठे व्यावसायिक आणि रसवंती गृहावाले आपला दिवसभरातील कचरा याच ठिकाण टाकतात. त्यामुळं याठिकाणी घाणीचे आणि कचऱ्याचे अधिकच प्रमाण वाढले आहे. 

त्यामुळं देहू नगरपंचायत प्रशासन आणि येथील स्थानिक लोकप्रतिनिधी काही उपाय योजना करणार का? हा मुद्दा प्रश्र्नांकितचं.