भारतीय सैनिकांना अनोखी मानवंदना...
![भारतीय सैनिकांना अनोखी मानवंदना...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66bc78f075f3b.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
नाशिकच्या तरुणीने साकारला जगातील सर्वात लहान आणि सूक्ष्म तिरंगा
नाशिक दि.१४ : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय सैनिकां बद्दल असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि देशा प्रती असलेली आपली भावना व्यक्त करण्यासाठी नाशिक शहरांमधील इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर सुप्रसिद्ध सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांनी हातात तिरंगा घेतलेल्या भारतीय सैनिकांची प्रतिमा दैनंदिन जीवनातील आहारात वापरण्यात येणाऱ्या अर्ध्या शेंगदाणावरती रंगीत चित्र साकारले आहे, त्यासोबतच दैनंदिन आहारातील भाजीच्या फोडणीत वापरण्यात येणाऱ्या मोहरी वरती तसेच रव्या वरती भारताचा तिरंगा साकारला असून हा जगातील सर्वात लहान तिरंगा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे कुठलेही सूक्ष्म चित्र काढताना त्या कुठल्याही प्रकारचा भिंगाचा वापर करत नाही, त्यामुळे त्यांना नुकताच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून जगातील सर्वात पहिली सूक्ष्म चित्रकार म्हणून नावाजले आहे.