किनगाव ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी...
![किनगाव ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65951b78f3aeb.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख
लातूर : अहमदपुर तालुक्यातील किनगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज दि.०३ जानेवारी रोजी सकाळी ११. वाजता; स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या व थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच सुमित्राबाई वाहूळे, उपसरपंच विठ्ठलराव बोडके, रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सुनील वाहूळे, ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख, शुभम मुंढे तसेच मंजूर देशमुख, बालाजी कांबळे, बाबूभाई गुत्तेदार, राजू हुडगे, मेघराज चावरे, प्रितम कांबळे, मीना वाहूळे आदीजन उपस्थित होते.