मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य - मुख्याधिकारी संदीप चौधरी.! दिंडोरीत मॅरेथॉनच्या माध्यमातून जमजागृती

मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य - मुख्याधिकारी संदीप चौधरी.! दिंडोरीत मॅरेथॉनच्या माध्यमातून जमजागृती

 प्रतिनिधी - बापू चव्हाण, दिंडोरी

मतदान हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे आहे.या कर्तव्य भावनेने हा प्रयत्न असल्याने यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन  दिंडोरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप चौधरी यांनी केले आहे.  

नगरपंचायत क्षेत्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे,तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकासअधिकारी नम्रता जगताप, नगरपंचायत मुख्याधिकारी संदीप चौधरी आदींच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमांतून मतदारांची जनजागृती करण्यात येत असुन नगरपंचायतीच्यावतीने मतदार जनजागृती बाबत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.याचाच एक भाग म्हणून रविवार,दि.१२ मे २०२४  रोजी सकाळी ७.३० वा. मॅरेथॉन नगरपंचायतीच्यावतीने शहरातील जनता इंग्लिश स्कूल ते बस स्थानक, नवीन नाशिक कळवण रोड,दिंडोरी या मार्गाने काढण्यात आली.

यावेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी संदीप चौधरी,जनता इंग्लिश स्कुलचे पर्यवेक्षक प्रतिभा मापारी,अग्निपंख अकेंडमीचे सागर वानखेडे,संतोष कथार,आदीसह  दिंडोरी नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी,विविध शाळा कॉलेजमधील तसेच जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक,विद्यार्थी तसेच नागरिक व अग्नीपंख अकॅडमीचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. मॅरेथॉन विजेते पुढीलप्रमाणे- अग्निपंख अकॅडमी, दिंडोरीचे विद्यार्थी स्त्री - 1) स्वाती मनोहर सोनवणे, 2) आरती काशिनाथ वाघमारे, 3) निकिता नरेंद्र जाधव व पुरुष - 1) रोहित संदीप बोरस्ते, 2) शिवम नंदू खुर्दळ, 3) सिद्धार्थ धनराज बर्डे व ज्येष्ठ - जनता इंग्लिश स्कूल,दिंडोरीचे शिक्षक प्रमोद सोनवणे.