चाकण वाहतुकीचे तीन तेरा नऊ बारा, वाहतूक पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत..!

चाकण वाहतुकीचे तीन तेरा नऊ बारा, वाहतूक पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण :  मागील बऱ्याच दिवसापासून चाकणची वाहतूक कोंडीचा प्रश्न आव वासून बसला आहे. त्यातच अगोदरच तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या संदर्भात लोकप्रतिनिधी व सरकार उदाशीन असतांनाच चाकण वाहतूक विभागही कुठे तरी आळशी झाल्याचे दिसून आले आहे.

चाकण शहरातील तळेगाव चौकात सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असते. चौकातील वाहतूक कोंडीचे सुयोग्य नियोजन झाले नाही कि, तीच वाहतूक कोंडी तळेगाव रस्ता जांब करून टाकते. चाकण वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या दिमतीला जे वार्डन दिले आहेत ते बरेच कर्मचारी आपला दिलेला पॉईंट सोडून दुसऱ्या ठिकाणीच असल्याचे दिसून आले आहे. सायंकाळी वाहतूक कोंडी प्रचंड असतानाही चाकण व माणिक चौकातील कर्मचारी आपले कर्तव्य सोडून निवांत दरवाज्याच्या काळ्या केलेल्या काचांच्या कॅबीनमध्ये आराम करताना दिसून आले.

आपले कर्तव्य सोडून कर्मचारी जर फक्त आर्थिक लोभापोटी वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करत असतील तर वाहतूक कोंडीची चाकण परिसरात तीन तेरा नऊ बारा अशीच काहीशी स्थिती झाल्याचे दिसून येत आहे.त्यात रिक्षा वाहतूक दार बेजाबदार पणे रिक्षा चालवून अगोदरच वाहतूक कोंडीला अडथळा निर्माण करत असताना त्यांना कुणी काही बोलायला गेले तर, आम्ही महिन्याचा टोल भरतो त्यामुळे आम्हाला वाहतूक विभागाचे साहेब काही करू शकत नाही असे आत्मविश्वासाने सांगत आहेत. त्यामुळे वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

अनेक वेळा एक सजक नागरिक म्हणून माध्यम प्रतिनिधी व काही सामाजिक कार्यकर्ते यांनी वाहतूक कार्म्च्री यांना सांगूनही त्यांच्यात कोणताही बदल होत नाही. उलट काही वाहतूक कर्मचारी उर्मट पद्धतीने सर्वसामन्य नागरिकांशी वर्तन करतानाचेहि समोर आले आहे. सायंकाळी वाहतूक कोंडी सोडवायची सोडून काही कर्मचारी मस्त आराम करताना दिसत आहेत. आणि वार्डनला ये बघ रे अशा सूचना करत आहेत. चाकण वाहतूक विभागात आता वाहतूक विभाग कर्मचारी आणि वार्डन हे एकाच तराजूत मोजले जात आहेत. वाहतूक विभागाचे कर्मचारी यांच्यापेक्षा वार्डन यांचीही मोठी रुबाबदारी दिसून येत आहे.

यामुळे कुठे तरी चाकण वाहतूक विभागाच्या अधिकारी यांचा कर्मचारी यांच्या वरील वचक कमी झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. जर साहेब जाणून बुजून कर्मचारी यांच्या कामचुकार पणाकडे दुर्लक्ष करत असतील तर कुठे तरी अर्थपूर्ण तडजोडी तर होत नाहीत ना? असाही सूर सर्वसामान्य नागरिकांच्याकडून उमटू लागला आहे. यावर आता वरिष्ठ अधिकारी काय ठोस पाऊले उचलतात हेच पहावे लागेल.