नवेगावबांध पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी.! बेपत्ता विद्यार्थ्याचा अवघ्या एका दिवसातच शोध...

नवेगावबांध पोलीस स्टेशनची कौतुकास्पद  कामगिरी.! बेपत्ता विद्यार्थ्याचा अवघ्या एका दिवसातच शोध...

प्रतिनिधी - साहिल रामटेके

गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील रेल्वेस्टेशनवरून; दि. 27 डिसेंबर 2024 रोजी तुषार डुंबरे (वय 15 वर्ष) रा. तुमडिमेंडा ता.देवरी हा मुलगा गोरेगाव येथे शाळेत जातो असं सांगत; सकाळच्या दरम्यान घरून निघाला.

मात्र तो घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोधाशोध घेतला.! परंतु, तो आढळून आला नाही.

अखेर त्यांच्या कुटुंबियांनी दि. ८ जानेवारी रोजी पोलीस स्टेशन नवेगाव/बांध येथे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

त्या तक्रारीवरून नवेगाव/बांध येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांनी गुन्ह्याचं गाभीर्य लक्षात घेऊन, पुढील तपासासाठी पोलीसांचे दोन पथक तयार करून तपास सुरु केलं असता; अवघ्या एका दिवसात म्हणजेच ९ तारखेला त्या मुलाचा शोध घेण्यास पोलिसांना यश मिळाले.

बेपत्ता त्या मुलाला कायदेशीरपणे आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं. या कामगिरीबद्दल नवेगाव/बांध येथील पोलीस स्टेशनचं सर्वत्र कौतुक होत.