बातमी'चा इफेक्ट.! पिंपळगाव डेपोची बस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधान...

बातमी'चा  इफेक्ट.! पिंपळगाव डेपोची बस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधान...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

पिंपळगाव बसवंत डेपोची सकाळी सुटणारी ६ वा. ची जोपुळ मार्गे येणारी एसटी गेल्या आठ ते दहा दिवसापासून अचानक बंद करण्यात आली होती. याबाबत न्यूज १५ मराठी चैनल याची तात्काळ दखल घेऊन एसटी बंद असल्याचे वृत्त प्रसिद्ध करतातच; ही बस पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी न्यूज १५ मराठी चैनलचे व डेपो मॅनेजर गोसावी यांचे आभार मानले.

याबाबत वृत्त असे की; पिंपळगाव बसवंत डेपोची एसटी काही दिवसांपासून अचानक बंद करण्यात आल्याने, जवळपास ५० ते ६० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत होते. काही विद्यार्थी पायी तर काही विद्यार्थी खाजगी वाहनाने प्रवास करत होते. यामधून विद्यार्थिनी ही सुटल्या नाही. त्यांना एसटीचे पास असून देखील प्रवास करता येत नव्हता.! त्यातच विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्याने करायचे काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पालकांना व प्रवाशांना पडला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी न्यूज १५ मराठीचे  प्रतिनिधी बापू चव्हाण यांच्याशी संपर्क साधून या बंद असलेल्या एसटी बाबत व्यथा मांडताच त्याची तात्काळ दखल घेत एसटी बंद असल्याचे वृत्त प्रसिद्ध करतातच दुसऱ्या दिवशी ही बस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्याने विद्यार्थ्यांनी पालक व प्रवाशांनी न्यूज १५ मराठीचे आभार मानले.