बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश...

बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश...

NEWS15 प्रतिनिधी : काशिनाथ चव्हाण

जळगाव : जिल्ह्यातील जळगाव विमानतळ परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याचा वावर आढळून आल्याने, या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवून व पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. 

विमानतळ येथील प्रबंधक भारतीय विमान प्राधिकरण, जळगाव विमानतळ यांना विमानतळाच्या धावपट्टीवर सातत्याने बिबट्याचा वावर आढळून आला. याबाबत त्यांनी वनविभागाला सूचित केले. वनविभागाने  मागील दहा दिवसापासून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत; बिबट्याच्या वावराबद्दल खात्री करण्यासाठी जागोजागी ट्रॅप कॅमेरे लावले आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे बसवले. पकडण्यात आलेले बिबटया, मादी आणि दोन बछडे त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या कार्यवाहीत जळगाव वनविभागाचे सहा. वनरक्षक यु. एम.बिराजदार, वनपरिक्षेत्र अधिकारी एन. ए .बोरकर, वनपाल संदीप पाटील, वनपाल जी.एस.चौधरी, वनरक्षक उल्हास पाटील, वनरक्षक दीपक पाटील यांच्यासह वनविभागाच्या इतरही अधिकाऱ्याचा सहभाग होता.