आगामी सण - उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च...

प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी
पाटणबोरी : आगामी सण उत्सवादरम्यान गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज पाटणबोरी शहरात मुख्य मार्गावरून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.
या रूट मार्चला शहरातील पोलीस आऊट पोस्ट पासून सुरुवात झाली. त्यानंतर बस स्टँड चौक, टॉकीज रोड, शिवाजी चौक, गुंडोबा चौक, राम मंदिर चौक जगदंबा मंदिर चौक, मुख्य चौक, विसर्जन घाट असे मार्गक्रमण करीत परत स्टेशनमध्ये रूट मार्च आला व समारोप करण्यात आला.
या रूट मध्ये पांढरकवडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे, एपीआय रमाकांत खंदारे, व आदी सहभागी होते. या अगोदर शहरात गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा होण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी पोलिसांनी अगोदरपासूनच तयारी सुरू ठेवली आहे. सार्वजनिक मंडळाच्या बैठका आयोजित करून तशा आवश्यक सूचना दिलेल्या आहे.