मडकीजांब येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांचे भूमिपूजन...

मडकीजांब येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांचे भूमिपूजन...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन नवीन मंजूर झालेल्या वर्ग खोल्यांचे भूमिपूजन सरपंच रोहिणी मोरे,उपसरपंच अनिल वडजे यांचे तसेच ग्रामस्थांच्या हस्ते संपन्न झाले.

मडकीजांब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते सात वर्ग असून गेल्या दहा वर्षापासून चार खोल्या निर्लेखित केल्यामुळे वर्ग खोल्यांची अडचण निर्माण झालेली होती.जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषदेस वर्गखोल्यांचा निधी वितरित झाल्यामुळे चार पैकी दोन खोल्या मंजूर झालेल्या आहेत अद्यापही दोन वर्ग खोल्यांची शाळेस गरज असून त्या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका छाया पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.यावेळी पोलीस पाटील रोहिणी वडजे यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल जिल्हा परिषद शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी  तंटामुक्ती समिती अध्यक्ष साहेबराव वडजे,विलास वडजे, जितेंद्र वडजे, रघुनाथ जगताप, प्रभाकर वडजे, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष सचिन वडजे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद वडजे, बांधकाम ठेकेदार मनोज पाटील, सुरेश धुमणे, गोकुळ वडजे, बाकेराव बोराडे, बाळासाहेब धुमणे, संपतराव धुमणे, मोहन सोमवंशी, सुभाष वडजे, मनोहर सोमवंशी, ग्रा.प. सदस्य आनंदा धुमणे, शरद गांगोडे, रविंद्र गांगोडे, उज्वला रेहरे, शीतल गांगोडे, कैलास गायकवाड, विजय वडजे, शशिकांत गायकवाड , ग्रामसेवक समाधान शेवाळे, मुख्याध्यापक बाळासाहेब गांगुर्डे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा देसले यांनी केले.तर आभार राठोड यांनी मानले.