मोठी बातमी : ATM बॅटऱ्या चोरणाऱ्या सराईत चोरास अटक, आळंदी पोलीसांची दमदार कामगिरी...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
आळंदी : ATM च्या बॅटऱ्या चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारास आळंदी पोलिसांनी अटक करून एकूण ४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल असलेल्या २४ बॅटऱ्या जप्त केल्या आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, बुधवार(दि. ९) रोजी आळंदी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बॅटरी चोरी गुन्ह्याच्या संदर्भात शोध घेत असताना तपास पथकातील अंमलदार यांनी चिंबळी, मोशी, दिघी परिसरातील सिसिटीव्ही कॅमेरे तपासत असताना (दि.१२) रोजी तपास पथकातील अंमलदार वहिल यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, चिंबळी फाटा येथे आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बर्गेवस्ती येथील हिताची ATM मधील बॅटरी चोरी करणारा चोर चिंबळी फाटा येथे बॅटरी विकण्यासाठी येणार आहे. त्याला आळंदी पोलिसांनी पोलीस हवालदार लोणकर, वहील, पोलीस शिपाई नरवडे यांनी पाळत ठेऊन संशयित आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली.
पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने दत्तात्रय विठ्ठल भोसले(वय. ४४ वर्षे)रा. समर्थ कॉलनी कृष्णकुंज बिल्डिंग दिघी, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. स्वामीसमर्थ मंदिरासमोर अक्कलकोट, जि. सोलापूर असे नाव असल्याचे सांगितले. त्याच्याकडे बॅटरी चोरी संदर्भात चौकशी केली असता. त्याने सांगितले की, (दि. ६)रोजी आरोपीने बर्गे वस्ती चिंबळी येथील हिताची कंपनीचे ATM मधील ३ बॅटऱ्या चोरी केल्या असल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीकडे सखोल तपास केला असता त्यांच्याकडून एकूण ४ लाख रुपये किमतीच्या आळंदी, चाकण व महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बॅटऱ्या जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले.
सदर कारवाई आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस हवालदार लोणकर, वहील, होले, पोलीस शिपाई नरवडे, दहिफळे, खेडकर, डुमनर, सूर्यवंशी, डिकले, सातपुते यांनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार लोणकर हे करीत आहेत.