जुगार खेळताना रांगेहाथ पकडलेले देहू संस्थानचे विश्वस्त विशाल मोरे यांची अखेर हकालपट्टी...!

जुगार खेळताना रांगेहाथ पकडलेले देहू संस्थानचे विश्वस्त विशाल मोरे यांची अखेर हकालपट्टी...!
जुगार खेळताना रांगेहाथ पकडलेले देहू संस्थानचे विश्वस्त विशाल मोरे यांची अखेर हकालपट्टी...!
जुगार खेळताना रांगेहाथ पकडलेले देहू संस्थानचे विश्वस्त विशाल मोरे यांची अखेर हकालपट्टी...!

News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

देहू : पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. क्षेत्र देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विशाल मोरे जुगार खेळताना पकडल्यानंतर अखेर संस्थांनकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रिक्त झालेल्या जागी निवडणूक प्रक्रिया राबवविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये देहूमधीलच नाना मोरे यांचा विश्वस्त पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाला आहे. त्यामुळे जगद्तगुरु संत तुकाराम महाराज यांच्या संस्थांनवर नाना मोरे यांची बिनविरोध निवड होण्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील येलवाडी गावातील एका बंद कंपनीमध्ये जुगार अड्डा सुरू करण्यात आला होता. यामध्ये देहू संस्थांनचे विश्वस्त विशाल मोरेंना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. यामुळे वारकरी सांप्रदायाची मोठी नाच्चकी व संप्रदायात एकच खळबळ उडाली होती.

या प्रकरणानंतर विश्वस्त विशाल मोरे यांना अटकही झाली होती या अटकेवरून विशाल मोरे यांच्याबद्दल देहू गावात मोठे रोषाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर संस्थानाकडून विशाल मोरे यावर तडकाफडकी निलंबन करण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर नक्की विशाल मोरे याच्या नंतर संत तुकाराम महाराज संस्थाचा नवा विश्वस्त कोण? यांची चर्चा देहू गावात रंगली होती. त्यानंतर आता रिक्त झालेल्या विश्वस्त पदासाठी नाना मोरे यांनी एकच अर्ज दाखल केल्याने त्यांची या पदावर बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  देहू नगरपंचायतचे आजी-माजी विश्वस्त तसेच देहू नगरपंचायतीचे नगरसेवक आणि एका नगरसेविकेच्या पतीसह २६ जणांना मागील काही दिवसापूर्वी तीन पत्ती जुगार खेळताना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक केली होती त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते.