आज पासून पितृपक्षाला सुरुवात.! पूर्वजांसाठी तर्पणाचा शुभकाळ...
![आज पासून पितृपक्षाला सुरुवात.! पूर्वजांसाठी तर्पणाचा शुभकाळ...](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66ea5123702a0.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
गणपती विसर्जनानंतर आजपासून खऱ्या अर्थाने पितृपक्ष पूर्वजांसाठी तर्पनाचा शुभकाळ सुरू झाल्याने नागरिकांमध्ये व सगेसोयरे यांची लगबग सुरू होणार आहे.
भाद्रपद पौर्णिमा नंतर सुरू होणारा पितृपक्ष हा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्राद्ध आणि तर्पनाच्या विधी या काळात पार पडतात.यावर्षी पितृपक्षाचा पंधरवाडा दि.१८ सप्टेंबर पासून ते दि.२ ऑक्टोंबर पर्यंत चालणार असल्याने या कालावधीमध्ये पिंडदान पुरोहित भोजन तर्पण आणि दानधर्माचे महत्त्वाचे विधी केले जातात.
पितृपक्षाचा खरा प्रारंभ भाद्रपद पौर्णिमेपासून होतो दि. १८ सप्टेंबर रोजी प्रतिपदा विधीने या काळाला सुरुवात होत आहे यावेळी पूर्वजांच्या दर्पणासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांतीसाठी श्रद्धेने पूजा केली जाते सर्व पित्री अमोशापर्यंत विविध तिथींना श्राद्ध आणि धार्मिक विधी पार पडतात. याशिवाय नातेवाईक सगेसोयरे यांनाही या निमित्ताने आमंत्रित केल्याची प्रथा आजही कायम आहे.