जरुघाटा येथे रोडचे काम निकृष्ठ दर्जाचे? पावसाळ्यात सिमेंट वाहून गेले...
![जरुघाटा येथे रोडचे काम निकृष्ठ दर्जाचे? पावसाळ्यात सिमेंट वाहून गेले...](https://news15marathi.com/uploads/images/202310/image_750x_652a137b92c18.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, मोरगाव/अर्जुनी
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुकळी ते प्रतापगड ते गोठणगाव रा. मा. ३५४ टी - पाॅंईंट ते प्रतापगड हा रोड सार्वजनिक बांधकाम विभाग अर्जुनी मोरगाव अंतर्गत आहे. पण सन २०२१-२२ मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था गोंदिया महाराष्ट्र शासन विकास मंत्रालय यांचे सौजन्याने टी-पाॅईंट ते प्रतापगड जरूघाटा, दिनकरनगर करांडली या रोडावर ० ते ७/४४० किमी. अंदाजे साडे सात किमी. कामासाठी अंदाजपत्रकामध्ये ४४० रूपयात सदर काम एम.एस.रामदेव कंन्ट्रक्शन कंपनी साकोली यांना देण्यात आले.
सदर काम आरंभ करण्याचे पत्र २ नोव्हेंबर २०२१ ते १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत रोडाचे काम पूर्ण करणे होते. मात्र हे काम २४ फेब्रुवारी २०२३ मध्ये काम सुरु करण्यात आले. प्रतापगड येथे भरणा-या महाशिवरात्री यात्रे नंतर सन २०२३ मध्ये सुरु केले. सुकळी ते गोठणगाव - प्रतापगड टी पाॅईंट या रोडाची दरवर्षी महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या यात्रेपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग अर्जुनी मोरगाव डागडूजी करीत असते. सदर रोड ७ मी. रूंद असून ये-जा करण्यासाठी सुस्थितीत आहे. या टी पाॅईंट वरून ४ किमी. प्रतापगड पर्यंत मजबूत रोडावर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पूर्वीच्या डांबरीकरण रोडावर कारपेट मारून दोन्ही बाजुला मुरूम मरून बुट पाॅलिश करण्याचे काम केले. वास्तविक प्रतापगड ते जरुघाटा, दिनकरनगर, करांडली या ८ किमी. रोडावर काम करणे होते. पण तसे न करता दिनकरनगर ते करांडली या ४ किमी. सोडून दिला. प्रतापगड ते जरुघाटा, दिनकरनगर हा रोड जमिनीपासून एक मी. खडीकरण व डांबरीकरण तीन वर्षापूर्वी झाले होते. दिनकरनगर ते करांडली ४ किमी. रोड जमिनीच्या बरोबर असल्याने या रोडावर जास्त मटेरियल लागत असल्याने या रोडाचे काम न केल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत होत असलेले काम सुस्थितीत असलेल्या डांबरीकरण असलेला रोड खोदून त्याचेवर रोलर चालवून त्यावर सिलकोट करून डांबरीकरण करणे व दोन्ही बाजुला मुरुम टाकणे असेच काम केले जात आहे. सदर काम मुख्य कंत्राटदाराने पेटी कंत्राटदार अर्जुनी मोरगाव येथील कंत्राटदाराला दिले. पेटी कंत्राटदाराने सदर ७ किमी.रोड ५ ते ६ महिन्यात तयार केले. त्यामध्ये जरुघाटा येथे निकृष्ठ दर्जाचे काम केल्याने पावसाळ्यातच सिमेंट वाहून गेले. तसेच आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात शेकडो ट्रॅक्टर मुरुम केशोरी सा.जा.अंतर्गत ग्राम केळवद येथील गट नं. २३४/१ मधून एक हेक्टर जागेमधून राॅयल्टी न काढता जेसीबी मशीनने उत्खनन करून ८ ते १० ट्रॅक्टरने रात्री या ८ किमी. रोडावर टाकण्यात आले. या प्रकरणाची उमा धरमा काले जरुघाटा यांनी चौकशीचि मागणी केली आहे.