कोऱ्हाटे प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप...

कोऱ्हाटे प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप...

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील जि.प.प्राथमीक शाळेच्या विद्यार्थ्यांना बँक ऑफ बडोदा दिंडोरी यांच्याकडून बँकेच्या ११६ व्या वर्धापन दिनानिमित्त  विद्यार्थ्यांना ५००० रु किमतीचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.शाळेतील सर्व ६८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ वह्या, १ मराठी अंकलिपी, १ इंग्रजी अंकलिपी, १ कलर पेन बॉक्स १ पेन, १पेन्सिल,१ खोडरबर व खाऊ वाटप करण्यात आला.  

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर बोरनारे, कॅशियर सानप,सरपंच अश्विनी दोडके,उपसरपंच बाळासाहेब कदम, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुदाम शिंदे, सोसायटी चेअरमन सोमनाथ कदम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद बदादे,ग्रामपंचायत सदस्य दिगंबर शिंदे,रामकृष्ण शिंदे, मुख्याध्यापक कमलाकर राऊत,आदी उपस्थित होते.यावेळी मुख्याध्यापक सुनील राऊत त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून बँकेचे ध्येय धोरण व बँकेचे उपक्रम याबद्दल माहिती देऊन शाळेच्या व ग्रामस्थांच्यावतीने आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलदीप हुंडारे यांनी आभार मानले.